Ad will apear here
Next
‘घे भरारी’तून मिळणार व्यावसायिकांना बळ
शुभारंभ लॉन्स येथे तीन दिवसीय फन-फूड महोत्सव
‘घे भरारी’ महोत्सवाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना (डावीकडून) समीर देशपांडे, नीलम उमराणी, राहुल कुलकर्णी व संदीप चाफेकर.

पुणे : ‘व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोल्डन ट्युलिप इव्हेंट्स’च्या वतीने ‘घे भरारी’ या तीन दिवसीय फन-फूड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन ते पाच जानेवारी २०२० या कालावधीत शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत हा महोत्सव होत आहे. लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे,’ अशी माहिती संयोजक राहुल कुलकर्णी, नीलम उमराणी-यदलाबादकर, संदीप चाफेकर आणि  समीर देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राहुल कुलकर्णी म्हणाले, ‘प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी, तीन जानेवारी २०२० रोजी सकाळी १२ वाजता माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. नोकरी सोडून लोकांनी व्यवसायात उतरावे, हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. नोकरी सांभाळून जे लोक व्यवसाय करतात अशांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. राज्यभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, आयुर्वेदिक औषधे,  ट्रॅव्हल्स, लाईफ इन्श्युरन्स, दागिने अशा विविध प्रकारच्या वस्तू, सेवा यांचे स्टॉल्स येथे असतील. लहान मुलांसाठी खेळ, तर गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू याचीही सोय आहे. कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खानदेशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल. याशिवाय मनीषा निश्चल यांच्या गाण्यांची मैफल,  जादूचे प्रयोग, चैताली माजगावकर यांचा ‘पपेट शो’ असे मनोरंजनाचे विविध कार्यक्रमही होणार आहेत. त्यामुळे या महोत्सवात लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी मनोरंजन, खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.’

‘या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण मतिमंद पुनवर्सन केंद्राचा स्टॉल असणार आहे. यामध्ये जुन्या कपड्यापासून केलेल्या पिशव्या, पायपुसणी यासह विविध अन्य प्रकार विक्रीसाठी ठेवणार आहेत. तसेच कोल्हापुरातील इचलकरंजी येथील मुक कर्णबधीर वरुण बरगाले यांचा अडॉरेबल व्हाईट कलेक्शन असा आगळा वेगळा स्टॉल असणार आहे. ख्यातमान वादक उमेश्वर भुवन हे ‘कहोन’ हे जागतिक संगीतात वापरले जाणारे वाद्य याविषयी कार्यशाळा घेणार आहेत,’ असेही राहुल कुलकर्णी यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZDKCH
Similar Posts
‘पानिपत’च्या कलाकारांनी पाहिले चित्रपटासाठी घडविलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन पुणे : बहुचर्चित पानिपत या ऐतिहासिक चित्रपटासाठी पुण्यातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ने आठशेपेक्षा जास्त प्रकारचे दागिने घडवले आहेत. या चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या औंध येथील दालनाला भेट दिली. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर, कृति सेनन आणि सुनीता गोवारीकर यांचा समावेश होता
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या
काँक्रीटची मजबुती मोजणारा भारतीय बनावटीचा पहिला ‘मॅच्युरिटी मीटर’ विकसित पुणे : बांधकामात वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन’ने (पीसीईआरएफ) संपूर्णतः भारतीय बनावटीचे ‘मॅच्युरिटी मीटर’ हे उपकरण देशात प्रथमतः विकसित केले आहे. या मॅच्युरिटी मीटरची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परदेशी मॅच्युरिटी मीटरच्या किमतीच्या केवळ ३५ ते ४० टक्के इतकीच आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language